उन्हाळ्यात सरबतांमधून सब्जा सेवन करण्याचं प्रमाण वाढतं. सब्जात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आरोग्यास गुणकारी असलेला सब्जा केसांसाठीही फायदेशीर आहे. केसांशी निगडित अनेक समस्या सब्जाचा वापर केसांवर केल्यानं कमी दूर होतात. लांबसडक निरोगी दाट केसांसाठी सब्जाचा उपयोग होतो.
Image: Google
केसांना सब्जा लावल्यास..
1. सब्जामध्ये लोह आणि फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं. या दोन घटकांमुळे केसांना दोन तोंडं फुटण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येतं. यासाठी सब्जा बी मिक्सरमधून वाटून घ्यावा. सब्जाची पावडरमध्ये थोडी आवळा पावडर आणि रिठे पावडर घालावी. तिन्ही पावडर नीट मिसळून घ्याव्यात. मेहंदी भिजवतो त्याप्रमाणे पाणी टाकून पावडर भिजवावी. मिश्रण केसांना लावावं. दोन तास ठेवल्यानंतर केस पाण्यानं धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा असा नियमित केल्यास समस्या लवकर दूर होते.
2. सब्जात प्रथिनं आणि फायटो केमिकल्स असतात. याचा उपयोग केस मजबूत करुन केस गळती रोखण्यासाठी होतो. यासाठी एक मूठ सब्जा रात्रभर पाण्यात भिजवावा. सकाळी केस धुताना सब्जा भिजवलेलं पाण्याचा वापर करावा.
Image: Google
3. सब्जामध्ये जिवाणुविरोधी, दाह आणि सूजविरोधी गुणधर्म असतात. केसातील कोंड्यावर सब्जाचा उपाय करता येतो. यासाठी सब्जा उन्हात वाळवून सुकवावा. खोबऱ्याच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडी सब्जा पावडर मिसळावी. या मिश्रणानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. मसाज झाल्यानंतर एक तासानं केस धुवावेत. या उपायानं केसातला कोंडा जातो.
4. क आणि अ जीवनसत्वाच्या अस्तित्वामुळे सब्जाचा उपयोग केस मऊ मुलायम करण्यासाठी होतो. चमकदार केसांसाठी सब्जाचा हेअर मास्क तयार करण्यासाठी मोहरी किंवा खोबऱ्याच्या तेलात सब्जाची पावडर घालावी. 3-4 जास्वंदेची फुलं घ्यावी. हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटावं. ही पेस्ट केसांना लावावी. ती सुकल्यावर सौम्य शाम्पूचा वापर करत केस धुवावेत.
Image: Google
5. डोकेदुखी, तणाव दूर करण्यासाठी सब्जा बीचा उपयोग होतो. रात्रभर सब्जा पाण्यात भिजवावा. सकाळी या पाण्यात लिंबाचा रस आणि जॅस्मिन तेलाचे काही थेंब टाकून या पाण्यानं केसांच्या मुळाशी मसाज केल्यास तणाव दूर होतो.