Join us  

ट्विंकल खन्ना सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, 'या' उपायामुळेच पन्नाशीनंतरही दिसते एवढी तरुण- सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 1:45 PM

Beauty Secret of Actress Twinkle Khanna: अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने तिचं ब्यूटी सिक्रेट नुकतंच सोशल मिडियावर शेअर केलं आहे....( Twinkle Khanna's home remedies for young and glowing skin)

ठळक मुद्देट्विंकलने जे ब्यूटी सिक्रेट सांगितलं आहे, ते प्रत्येकीला करता येणं अगदी सहजशक्य आहे.

बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका, इंटेरियर डेकोरेटर अशी ट्विंकल खन्ना हिची ओळख आहे. ट्विंकलने नुकतचं परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण केलं आणि वयाच्या पन्नाशीत तिने आणखी एक पदवी मिळवली. त्यामुळेही तिचं सगळीकडे खूप कौतूक होत आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही झाला. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वत:ला सतत गुंतवून ठेवणारी ट्विंकल नेहमीच काही ना काही शिकत असते, नवं काहीतरी आयुष्यात करून पाहात असते. एवढंच नाही तर तिच्या या सगळ्या नवनविन गोष्टींची माहिती ती सोशल मिडियावरून तिच्या चाहत्यांनाही देत असते. ( Twinkle Khanna's home remedies for young and glowing skin)

 

ट्विंकल सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आता सध्या तिने एक छानसा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना तिचं ब्यूटी सिक्रेट सांगितलं आहे.

सोनम कपूरने बाळंतपणानंतर घटवलं तब्बल २० किलो वजन, बघा वेटलॉससाठी तिने नेमकं काय केलं...

तिच्यासारखी नितळ, सुंदर त्वचा पाहिजे असेल तर ती सांगतेय तो उपाय करून पाहा. ट्विंकलने जे ब्यूटी सिक्रेट सांगितलं आहे, ते प्रत्येकीला करता येणं अगदी सहजशक्य आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरातच अगदी सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरून त्वचेची काळजी कशी घ्यायची, हे तिने सांगितलं आहे. 

 

ट्विंकल खन्नाचं ब्यूटी सिक्रेट 

फक्त ३ पदार्थ वापरून त्वचेची काळजी कशी घ्यायची हे ट्विंकल खन्नाने सांगितलं आहे.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

यामध्ये १ टेबलस्पून हळद, २ टेबलस्पून बेसन पीठ, २ टेबलस्पून दही घ्या. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा.

हा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटे चेहरा तसच ठेवा.

त्यानंतर फेसपॅक धुवून टाका. फेसपॅक अर्धवट सुकलेला असताना हाताने अलगद चोळून काढला तरी चालतं. यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त केस, टॅनिंग, डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सट्विंकल खन्नाहोम रेमेडी