Join us  

केसगळतीला वैतागलात? वापरा १ खास शाम्पू, काही दिवसांत केसगळती होईल बंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 3:30 PM

1 Special Shampoo to reduce Hair fall : स्वस्तात मस्त नैसर्गिक गुणांनी युक्त असलेला शाम्पू एकदा वापरुन तर पाहा...

केसगळती हा बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रश्न असतो. थंडीच्या दिवसांत आणि एरवीही केस जास्त प्रमाणात गळले तर आपले केस पातळ होतील म्हणून स्त्रियांना खूप चिंता वाटायला लागते. जमिनीवर, कंगव्यात आणि सगळीकडेच गळलेले केस दिसायला लागले की केसगळती कमी होण्यासाठी नेमके काय उपाय करावेत हे अनेकदा आपल्याला कळत नाही. दिवसाला १०० केस गळणे सामान्य असले तरी त्याहून जास्त केस गळत असतील तर मात्र आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होण्याची शक्यता असते (1 Special Shampoo to reduce Hair fall). 

केस एकदा पातळ व्हायला लागले की ते पुन्हा दाट होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. केस काळेभोर, लांबसडक आणि दाट-मुलायम असतील तर सौंदर्यात भर पडते पण तसे नसेल तर मात्र केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला काही ना काही उपाय करावे लागतात. आपण वापरत असलेला शाम्पू केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असून केसांचे गळणे कमी होण्यासाठी नैसर्गिक घटक असलेला एक खास शाम्पू सौंदर्यतज्ज्ञ असलेले रोहीत सचदेव सांगतात, तो कोणता आणि कसा वापरायचा पाहूया...

(Image : Google)

कोणता शाम्पू वापरावा? 

नॅचरली (Naturali Hair Fall Arrest Shampoo) नावाचा शाम्पू केसांसाठी वापरल्यास त्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. या शाम्पूची किंमतही खूप जास्त नसून तो केवळ २०० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये असणारे भृंगराज आणि कांद्याचा रस यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते. केसांची मुळे मजबूत होण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी यातील घटक अतिशय उपयुक्त आहेत. हा शाम्पू वापरल्यानंतर केसगळती कमी होण्यास आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल. केसांचा पोत कोणताही असेल तरी हा शाम्पू सूट होणारा आहे आणि हा शाम्पू १०० टक्के सल्फेट आणि पॅराबेनपफ्री आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी