Join us

राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:54 IST

1 / 9
Raj Thackeray Mumbai Local Train Travel: मतदारयादीतील घोळावरून मनसे, महाविकास आघाडीसह विरोधकांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला. राज ठाकरे यांचे लोकलने मोर्चाला पोहोचणे, मोर्चाआधी उद्धव ठाकरेंशी त्यांनी केलेली चर्चा, मोर्चातील सहभागाविषयीची शंका दूर करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सहभाग आणि विविध विरोधी पक्षांच्या कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा उत्साही सहभाग यामुळे मोर्चा लक्षणीय ठरला.
2 / 9
‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पश्चिम रेल्वेच्या दादर ते चर्चगट असा प्रवास लोकल ट्रेनने केला. राज ठाकरे यांना दादरला फर्स्ट क्लासच्या डब्यात चढल्यावर लगेचच विंडो सीट मिळाली. चर्चगेटपर्यंत खिडकीत बसून राज ठाकरे यांनी छान आरामात प्रवास केला.
3 / 9
परंतु, या निमित्ताने आता लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी, प्रवाशांच्या समस्या, विंडो सीट सोडाच पण हव्या त्या ट्रेनमध्ये चढायला न मिळणे, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणे अशा अनेक गोष्टींबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी लोकलने प्रवास केल्यावर सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.
4 / 9
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'सत्याच्या मोर्चा'ला जाताना लोकलने प्रवास केला. त्यावेळी फर्स्ट क्लास डब्यात त्यांना विंडो सीट मिळाली.
5 / 9
त्यावरून रेल्वेतील गर्दीमुळे त्रस्त असलेल्या अनेक रेल्वे प्रवाशांनी डोंबिवली, कल्याण, बदलापूर, मुंब्रा, दिवा या गर्दीच्या स्थानकातून राज ठाकरे हे सकाळी ८ ते ९ या वेळेत लोकलमधून प्रवास करताना विंडो सीट पकडू शकतील का, अशा या निमित्ताने काहींनी समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आहेत.
6 / 9
गर्दीमुळे रेल्वे प्रवासी प्रचंड त्रस्त असलेल्या प्रवाशांच्या समस्या किती तीव्र आहेत हेच या त्यांच्या पोस्टमुळे स्पष्ट होते. पण, रेल्वे अधिकारी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न आहे, अशी कुजबुज प्रवाशांमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.
7 / 9
दरम्यान, मुंबई लोकलवरील भार कमी व्हावा, प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा, यादृष्टीने काही अहवाल रेल्वेकडे सादर करण्यात आले. मेट्रोसारखी यंत्रणा, फेऱ्यांच्या रचनेत बदल करणे, तिन्ही मार्गांवर फिरतील, अशा रेल्वेसेवा देणे अशा अनेक गोष्टींचा यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
8 / 9
यातील काही उपाययोजना राबवल्यास रेल्वेच्या फेऱ्या वाढण्यात मदत होईल, असेही म्हटले जात आहे. परंतु, प्रवाशांना सरळ प्रवासाऐवजी सारख्या ट्रेन बदलाव्या लागतील, असेही म्हटले आहे. पावसाळ्यात रेल्वेला कायम फटका बसतो. यामुळे प्रवाशांची नेहमीच तारांबळ उडते, यावरही काम करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
9 / 9
तसेच एसी लोकल ट्रेनची संख्या वाढण्यात येणार आहे. ट्रेनच्या रचनेतही बदल करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याचा घाट घातला जाणार आहे. याबाबतही रेल्वेच्या स्तरावर विचार, तयारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbai Localमुंबई लोकलlocalलोकलAC localएसी लोकलrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेHarbour Railwayहार्बर रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स