कोण आहेत मिताली बोरुडे? जाणून घ्या राज ठाकरेंच्या भावी सूनबाईंबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 14:46 IST2017-12-11T14:42:12+5:302017-12-11T14:46:06+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचा सोमवारी मिताली बोरुडेबरोबर साखरपुडा झाला.
अमित आणि मिताली यांची मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाल्यानंतर आज त्यांचा साखरपुडा झाला.
पेशाने फॅशन डिझायनर असलेली मिताली प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरुडे यांची कन्या आहे.
अमित यांचे शिक्षण पोद्दार महाविद्यालयातून तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातून झाले आहे.