Mumbai Rains: मुंबईकरांना पावसानं झोडपलं, चाकरमान्यांचे प्रचंड हाल! पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:11 IST2025-05-07T22:02:09+5:302025-05-07T22:11:50+5:30

Mumbai Weather:हवामान विभागाने मुंबईत पुढील ३ ते ४ दिवसांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई शहरासह उपनगरात दुपारी साडेतीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपून काढले.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. अनेक भागात घराची पत्रे उडून गेल्याची घटना घडली.

या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. एका ठिकाणी वाहनावर झाड पडल्याची घटना घडली. या घटनेत वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.

दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व उपनगरातील विविध रस्ते पावसामुळे वाहतूक कोंडीत सापडले. त्यामुळे बुधवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरला.