ग्रँड रिसेप्शनसाठी मुंबईत पोहोचले 'विरुष्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:23 IST2017-12-23T17:12:30+5:302017-12-23T17:23:50+5:30

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.

दिल्लीतील रिसेप्शन सोहळा पार पडल्यानंतर आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे.

रिसेप्शनसाठी दोघेही शुक्रवारी मुंबईत पोहोचले.

रिसेप्शनला बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज हजर राहण्याची शक्यता आहे. अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल.