By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 20:35 IST
1 / 6म्हाडाच्या मुंबई मंडळाने २६४० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने घरांची सोडत होणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 2 / 6वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी ही घरे असून, त्यानुसारच अनामत रक्कमही निश्चित केली गेली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अर्ज शुल्क ५०० रुपये, जीएसटी ९० रुपये असे एकूण ५९० रुपये आकारले जाणार आहे. तर अनामत रक्कम १०००० रुपये आहे.3 / 6अत्यल्प उत्पन्न गटासाठीही अर्ज शुल्क ५९० रुपयेच असून, अनामत रक्कम २५००० रुपये आहे. अनामत रक्कम घर लागले नाही, तर परत मिळणार आहे. मात्र, अर्ज शुल्क परत मिळणार नाही.4 / 6अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५०००० रुपये असून, अर्ज शुल्क ५९० रुपये आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम १ लाख रुपये इतकी निश्चित केली गेली आहे.5 / 6उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम १,५०,००० रुपये असून, अर्ज शुल्क ५९० रुपयेच आहे. अनामत रक्कम जमा करण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या पर्यायांचा वापर करता येणार आहे.6 / 6अर्ज भरण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि फोटो ही कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे आधीच तयार ठेवा.