सन आयलाय गो, नारळी पुनवेचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 21:47 IST2017-08-06T21:26:55+5:302017-08-06T21:47:44+5:30

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे, कोळी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय. (छाया - सुशिल कदम)
नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांच्या बोली भाषेत ‘नारली पुनव’ (छाया - सुशिल कदम)
या दिवशी कोळीराजा दर्या- सागराला नारळ अर्पण करून त्याचे आभार व्यक्त करतात. (छाया - सुशिल कदम)
समुद्राकाठी रहाणार्या व प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. (छाया - सुशिल कदम)
समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. (छाया - सुशिल कदम)
पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. (छाया - सुशिल कदम)
यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात. (छाया - सुशिल कदम)