सोनम कपूरच्या घरी लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:14 IST2018-04-29T18:14:15+5:302018-04-29T18:14:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यासाठी मुंबईतील तिच्या निवासस्थानी लगीनघाई सुरू झाली आहे.
सोनम कपूर ही अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. सध्या अनिल कपूरच्या घराला वेगळाच साज चढला आहे. सोनमची आई सुनिता यांच्याकडून जातीने घराच्या सजावटीवर लक्ष ठेवले जात आहे.
सोनम कपूर तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
‘लग्नकार्यामध्ये अवास्तव खर्च करणार नाही’ असे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने सांगितले होते. त्यानंतर तिच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
सोनमने लग्नामध्ये जास्त खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला प्रियकर आनंद आहुजा आणि घरातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला.