Join us

Shahrukh khan: सर, अभ्यासात मन लागत नाही?, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचा भन्नाट रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 21:13 IST

1 / 9
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानने (Shah Rukh Khan) बुधवारी आपल्या ‘पठान’ (Pathaan) या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करत टीझरही रिलीज केला.
2 / 9
यानंतर काय तर सोशल मीडियावर ‘किंगखान’ ट्रेंड होऊ लागला. चाहते क्रेझी झालेत. चाहतांचा हा उत्साह पाहून शाहरूखला कदाचित राहावलं नाही
3 / 9
शाहरुखने ही ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन केलं. मग काय, चाहत्यांचे प्रश्न आणि शाहरूखची मजेशीर उत्तर असा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला.
4 / 9
शाहरुखला चाहत्याने अनेक प्रश्न विचारले, कुणी इतक्यादिवस कुठे होता, असा प्रश्न केला. तर, कुणी अभ्यासात मन लागत नाही काय करू, असा सल्लाही मागितला.
5 / 9
शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याच्या मन्नत या बंगल्याजवळ जाऊन फोटोशूट केले होते, ते फोटोही रिप्लायमध्ये शेअर केले आहेत. त्यावरही शाहरुखने प्रतिक्रिया दिला.
6 / 9
सर, अभ्यास कसा करू, नीट मन लागत नाहीत? असा प्रश्न शाहरुखला विचारला होता. त्यावर, दिमाग इस्तेमाल शायद काम करेगा, मन प्यार के लिए रख... असा भन्नाट रिप्लाय केला आहे.
7 / 9
दरम्यान, पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 25 जानेवारी 2023 रोजी ‘पठान’ रिलीज होतोय. हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
8 / 9
या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता जॉन अब्राहमची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
9 / 9
शाहरुखचा 2018 मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता.
टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानTwitterट्विटरcinemaसिनेमाMumbaiमुंबई