1 / 10सरकारी सेवांचा लाभ नागरिकांना अतिशय जलदगतीने घेता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आता ‘नमस्ते’ किंवा ‘हाय’ म्हटल्यास आपली सर्व कागदपत्रे डिजीलॉकरच्या माध्यमातून थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत. याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. 2 / 10संकेतस्थळावर जाण्याची गरज नाही.... व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना केंद्र सरकारने थेट डिजीलॉकर ॲक्सेस दिला आहे. या फिचरच्या माध्यमातून वापरकर्त्याला डिजीलॉकर खाते न उघडता पॅन कार्ड, वाहन परवाना आणि इतर अन्य कागदपत्रे थेट व्हॉट्स ॲपवर डाउनलोड करता येतील. 3 / 10यासाठी डिजीलॉकरच्या ॲप अथवा संकेतस्थळावर जाण्याची गरज नाही. वापरकर्त्यांना माय गव्हर्नमेंट हेल्पडेस्कची मदत मिळेल.4 / 10हा नंबर सेव्ह करा माय गव्हर्नमेंट हेल्पडेस्क आणि व्हॉट्सॲपने मिळून डिजीलॉकर सुविधा वापरकर्त्यांसाठी सादर केली आहे. 5 / 10व्हॉट्सॲपवर डिजीलॉकर सेवा सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर ९१-९०१३१५१५१५ हा नंबर फोनमध्ये सेव्ह करावा लागेल.6 / 10कशी मिळवाल कागदपत्रे? नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबरवर ‘डिजीलॉकर’, ‘हाय’ किंवा ‘नमस्ते’ लिहून व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे. 7 / 10वापरकर्ते यावर नवीन खातेही उघडू शकतात. जर आपल्याकडे अगोदरच डिजीलॉकर खाते असेल तर आधार नंबर टाकून तुम्ही त्याला वापरू शकता. 8 / 10 नोंदणीकृत आधार क्रमांकावर ओटीपी येईल त्यानंतर खाते व्हेरिफाय झाल्यानंतर कागदपत्रे डाउनलोड करता येतील.9 / 10 पॅन कार्ड । आधार कार्ड । वाहन परवाना । १० वी इयत्तेची मार्कशीट १२ वीची मार्कशीट । विमा पॉलिसी - दुचाकी । विमा पॉलिसी दस्तऐवज सत्य कागदपत्रे तत्काळ मिळणार10 / 10पॅन कार्ड । आधार कार्ड । वाहन परवाना । १० वी इयत्तेची मार्कशीट १२ वीची मार्कशीट । विमा पॉलिसी - दुचाकी । विमा पॉलिसी दस्तऐवज सत्य कागदपत्रे तत्काळ मिळणार