भाईजान मुंबईत परतले; चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 22:38 IST2018-04-07T22:37:26+5:302018-04-07T22:38:00+5:30

काळवीट शिकार प्रकरणातील दोषी सलमान खान शनिवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुंबईत दाखल झाला.
जोधपूर कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर सलमान मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाला.
मुंबई विमानतळावरून सलमान खानच्या गाड्यांचा ताफा गॅलेक्सी या निवासस्थानी पोहोचला.
यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
सलमान घरी पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चाहत्यांनी घोषणा देत, जल्लोष केला.
यावेळी सलमान खानने गॅलरीत येऊन चाहत्यांना झलक दिली आणि घरी जाण्याचे आवाहनही केले. यावेळी गॅलरीत सलमानसोबत वडील सलीम खान, आई, बहीण अर्पिता हेदेखील होते.
सलमान खानच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र कुमार जोशी यांनी आज निकाल दिला.
सलमानला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला.