मुंबईत रेड अलर्ट! २६ जुलैची आठवण करुन देणारा धो धो पाऊस; वादळी वाऱ्याचाही मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:48 PM2020-08-05T19:48:29+5:302020-08-05T20:20:21+5:30

मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे, या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे. अंधेरी मिलन सबवे येथील स्थिती

सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसातही फूड डिलिव्हरी देणारा बॉय

वादळी वारा आणि पाऊस याचा परिणाम रेल्वे सेवेवरही पडल्याचं दिसून येत आहे. चर्चगेट ते मरिनलाईन्स स्टेशनदरम्यान ओव्हर हेड तारेवर झाडं कोसळल्यानं लागली आग

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर शहरातील पूरस्थितीचा आढावा घेताना

उरण जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स पत्त्यासारख्या कोसळून सुमारे २०० कोटींचे नुकसान: सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

नवी मुंबई नेरुळ येथील डी. वाय पाटील स्टेडिअमच्या छप्पराचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे कोसळला

मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे संपूर्ण रस्त्यावर जलमय

हार्बर रेल्वे येथील वडाळा स्टेशनच्या आसपास रेल्वे रुळांवर पाणी साचलं

मुंबई सायन-माटुंगा रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहनं बंद पडली

मरिनलाईन्स येथे वाऱ्यामुळे विजेचा खांब कोसळला