नवरात्रौत्सवासाठी बाजारपेठा सजल्या! खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 15:37 IST2019-09-24T15:30:00+5:302019-09-24T15:37:47+5:30

नवरात्रौत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. देवीच्या मूर्तींवरही कलाकार अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)
भुलेश्वर, धारावी, मालाड, दादर, कुंभारवाडा यासह उपनगरांतील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
घटस्थापनेसाठी घटांना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गरब्यासाठी आकर्षक रंगाचे घागरे, चनिया-चोली, केडिया धोती, इंडो वेस्टर्न जॅकेट्सची खरेदी करण्यासाठी तरुणाई गर्दी करत आहे.
मुंबईकरांनी खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
पारंपरिक टिपऱ्यांसह बेरिंग टिपरी, घुंगरू टिपरी, स्टिल टिपऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
कवड्या व मणींचा वापर करून तयार केलेल्या हँडमेड दागिन्यांनी बाजारातील दागिन्यांची दुकाने फुलली आहेत.