मुंबई : 'एसी' लोकलची सफर, उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 16:13 IST2017-12-24T15:02:25+5:302017-12-24T16:13:02+5:30

मुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे. ( सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)
पहिली एसी लोकल उद्या दुपारी 2.10 वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल.
त्यानंतर अंधेरी ते विरार नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.
एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे.
प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे.
भारतीय बनावटीच्या या एसी लोकल आहेत
किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे.
दशकभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना वातानुकूलित लोकल प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ही एसी लोकल तयार करण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ही लोकल सेवेत येण्यावर शिक्कामोर्तब झाले.
नाताळसोबतच माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या लोकल सेवेचा मुहूर्त साधला जात आहे.
या लोकलला चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई, विरार असे थांबे देण्यात आले आहेत.
ही लोकलसेवा यशस्वी झाल्यास आयसीएफने आणखी ११ एसी लोकल बनविण्याची तयारी दर्शविली आहे.
पहिली एसी लोकल उद्या दुपारी २.१० वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल.
एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल.
ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल.
बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत.