Join us

मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:27 IST

1 / 10
Mumbai Train Blast Case: ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी मुंबईत झालेल्या साखळी रेल्वे बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. त्या बॉम्बस्फोटात १८९ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकजण जखमी झाले होते. आता १९ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यातील १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यापैकी पाच जणांना २०१५ मध्ये ट्रायल कोर्टाने फाशीची, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी बंदी घातलेल्या 'स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) चे सदस्य असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता.
2 / 10
यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली: कमल अहमद अन्सारी: सुनावणी सुरू असताना २०२१ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी याचे निधन झाले. अन्सारी हा बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याच्यावर पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्याचा आणि माटुंगा येथील बॉम्बस्फोटाचा आरोप होता.
3 / 10
मोहम्मद फैसल रहमान शेख: ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय आरोपीवर मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक असल्याचा आरोप होता. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्याला पाकिस्तानकडून निधी मिळाला, त्यातून त्याने बॉम्ब बनवला आणि ट्रेनमध्ये एक पेरला.
4 / 10
एहतेशाम सिद्दीकी- सिद्दीकी(४२) याच्यावर गाड्यांची रेकी करण्याचा आणि मीरा-भाईंदर बॉम्बस्फोट घडवण्याचा आरोप होता. नवीद हुसेन खान रशीद- सिकंदराबादचा रहिवासी(४४) स्फोटावेळी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. वांद्रे येथील ट्रेनमध्ये स्फोट घडवण्यासाठी बॉम्ब बनवण्याचा आणि ते पेरण्याचा आरोप होता. त्याला सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली होती.
5 / 10
आसिफ खान बशीर खान- ५२ वर्षीय खानवर बोरिवली येथील स्फोटासाठी बॉम्ब बनवण्याचा आणि पेरण्यास मदत करण्याचा आरोप होता. जळगाव येथील सिव्हिल इंजिनिअर असलेल्या खानवर सिमीचा प्रमुख सदस्य असल्याचाही आरोप होता.
6 / 10
यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे: तनवीर अहमद अन्सारी- मुंबईतील आग्रीपाडा येथील रहिवासी अन्सारी(५०) याला पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांना भेट देऊन गाड्यांची रेकी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
7 / 10
मोहम्मद शफी- ४६ वर्षीय शफीवर हवाला रॅकेट चालवण्याचा आणि स्फोटांसाठी पाकिस्तानमधून निधी गोळा करण्याचा आरोप होता. शेख मोहम्मद अली आलम- ५५ वर्षीय आलमवर भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लोकांच्या मदतीने गोवंडी येथील उपनगरातील घरी बॉम्ब बनवण्याचा आरोप होता. त्याच्यावर सिमीचा सदस्य असल्याचाही आरोप होता.
8 / 10
मोहम्मद साजिद अन्सारी- मीरा रोड येथील रहिवासी ४७ वर्षीय अन्सारीवर बॉम्बसाठी टायमर खरेदी करण्याचा आणि ते तयार करण्यास मदत करण्याचा आरोप होता. अन्सारीवर दोन पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्याचाही आरोप होता.
9 / 10
मुझम्मिल रहमान शेख- या प्रकरणातील सर्वात तरुण आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर शेखवर(४०) पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा आणि लोकल ट्रेनची रेकी केल्याचा आरोप होता. शेखचा भाऊ फैसल आणि राहिलदेखील या प्रकरणात आरोपी आहेत, परंतु त्यांना कधीही पकडण्यात आले नाही. ते दोघेही कटातील मुख्य कट रचणारे होते.
10 / 10
सुहैल महमूद शेख- ५५ वर्षीय शेखवर पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्याचा आणि बॉम्ब ठेवलेल्या गाड्यांची रेकी केल्याचा आरोप होता. जमीर रहमान शेख- ५० वर्षीय शेखवर कट रचण्यासाठी बैठकांना उपस्थित राहण्याचा आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा आरोप होता.
टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोटMumbaiमुंबईrailwayरेल्वेlocalलोकलterroristदहशतवादी