मुंबई : छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:40 IST2018-01-04T13:13:04+5:302018-01-04T13:40:15+5:30

गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणा-या मुंबईतील छात्रभारतीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली.
विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये छात्र भारतीने राष्ट्रीय छात्र संमेलनाचे गुरुवारी (4 जानेवारी) आयोजन केले होते.
मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू असल्याच्या कारणामुळे छात्रभारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.
महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीनंतर आज राष्ट्रीय छात्र संमेलनात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद बोलणार होते.
भाईदास सभागृह परिसराला आले होते छावणीचं स्वरुप
छात्र भारतीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्र भारतीच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे पोलिसांच्या ताब्यात.
आमदार कपिल पाटील यांनीही अटक