धुक्यात हरवलेली मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 14:50 IST2017-12-09T14:45:30+5:302017-12-09T14:50:00+5:30

आज (शनिवार) पहाटे सगळ्या मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली.

मुंबईतील पारा घसरल्यानं आधीच गारठा वाढला आहे. काही भागात धुकं इतकं दाट होतं की काही अंतरावरचंही दिसत नव्हतं.

धुक्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. बोरिवली - दहिसर लिंक रोडवरील हे दृश्य.

दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. रेल्वे वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.

टॅग्स :मुंबईMumbai