असे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:35 IST2019-08-20T13:19:37+5:302019-08-20T13:35:35+5:30

राजभवनातील 15 हजार चौरस फूट विस्तीर्ण ब्रिटिशकालीन बंकरचे रुपांतर 'भूमिगत संग्रहालयात' करण्यात आले आहे. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)

राजभवनाच्या इतिहासासोबतच राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहासही या संग्रहालयात मांडण्यात आला आहे.

या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष, 20 फूट उंच प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रशस्त मार्ग आहे.

'व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी' दाखविणारे दालनही तयार केले आहे.

तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल.

टॅग्स :मुंबईMumbai