Mumbai Cruise Rave Party: NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या डोक्यावर कुणाचा हात? पत्नी क्रांती रेडकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:50 AM2021-10-13T11:50:55+5:302021-10-13T11:57:01+5:30

Aryan Khan Arrested in Cruise Drugs Case by NCB; अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांना मिळालेल्या टीपनंतर त्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारी करत ८ जणांना ताब्यात घेतलं

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) सध्या ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कस्टडीत आहे. आर्यनच्या जामिनासाठी शाहरुख खानचे वकील प्रयत्न करत आहेत. आर्यन खान प्रकरणाचा तपास NCB अधिकारी समीर वानखेडे करत आहेत.

समीर वानखेडे यांनी एका टीपच्या आधारे २ ऑक्टोबरला मुंबईहून गोवा इथं जाणाऱ्या क्रुझवर धाड टाकली. यात ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. सध्या आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे.

आर्यन खानला जामीन मिळू नये यासाठी NCB प्रयत्नशील आहे. या प्रकरणावरुन एनसीबीचे अधिकारी दबावाखाली आहेत. अलीकडेच NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस दलातील २ कर्मचारी आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार डीजीपींकडे केली होती.

NCB ची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. या प्रकरणात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना का आणि कुणाच्या आदेशावरुन सोडण्यात आलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी केला होता.

समीर वानखेडे यांच्यावर दबाव असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता वानखेडेंची पत्नी क्रांती समोर आली आहे. क्रांती रेडकर(Kranti Redkar) ने ईटाईम्सशी बोलताना दबाव कशा प्रकारे हाताळायचा याबाबत समीरला चांगलेच माहिती आहे असं म्हंटली आहे.

समीर वानखेडे ऐतिहासिक नेत्यांशी कनेक्टेड आहे. समीरचं जग वेगवेगळ्या नेत्यांबाबत वाचून ते मोठे झालेत. रिअल लाईफमधील सिंघम अशी उपमा समीर वानखेडेंना लोकं देतात असंही क्रांती रेडकरनं सांगितले आहे. त्याचसोबत समीरला कुणाचं मार्गदर्शन आहे? याबाबत तिने सांगितले आहे

समीरचे वडील एक निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. जेव्हा कधीही समीरला टेन्शन येते किंवा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा समीर वानखेडे त्यांच्या वडिलांशी संवाद साधतात आणि त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घेतात. समीरला योग्य दिशा देण्याचं काम त्यांचे वडील करतात असं क्रांतीने सांगितले.

समीर वानखेडे २००८ बॅचचे IRS अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती.

त्यानंतर समीर वानखेडेंची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या २ वर्षांत सुमारे १७ हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये(NCB) बदली झाली आहे.

याआधीही क्रांतीने खंबीरपणे समीर वानखेडे यांची साथ दिली आहे. NCB बॉलिवूडला टार्गेट करत आहे असा आरोप करणाऱ्यांना क्रांतीने चांगलेच फटकारले होते. आधी आकडेवारीचा अभ्यास करा आणि त्यानंतर टीका करा. घरात सुरक्षित बसून मोबाईलवर टाईप करणं टीका टाइप करत असतो असा टोला लगावला.