1 / 5मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा डिसेंबरमध्ये आनंद पिरामल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आनंद हे पिरामल उद्योगाचे कार्यकारी संचालक आहेत. ईशा आणि आनंद यांचा विवाह भारतात संपन्न होणार आहे.2 / 5 अंबानी आणि पिरामल कुटुंब चार दशकांपासून एकमेकांना ओळखतं. या दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्रीचं नातं आहे.3 / 5आनंद पिरामल यांनी महाबळेश्वरच्या एका मंदिरात ईशाला लग्नासाठी विचारलं होतं. यावेळी दोन्ही कुटुंबातील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.4 / 5पिरामल हा देशातील प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक आहे. आनंद यांनी पिरामल रियल्टीची स्थापना केली. त्याआधी त्यांनी ग्रामीण भागात पिरामल ई-स्वास्थच्या माध्यमातून काम केलं. आज ही संस्था दिवसाकाठी 40 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार करते.5 / 5ईशा रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या कार्यकारणीची सदस्य आहे. ईशानं येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतलीय.