मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 00:09 IST2017-09-20T00:01:46+5:302017-09-20T00:09:32+5:30

ऑगस्टमध्ये पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले होते. मंगळवारी पावसामुळे पुन्हा अडकणार की काय अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली.

पावसाची सुरुवात होताच मुंबईतील अनेकांनी घर गाठण्यासाठी लवकर ऑफीसमधून निघण्याचा निर्णय घेतला

मुंबईतील अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा बंद राहण्याची घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोंद तावडे यांनी केली आहे.

सीप्झ ते हिरानंदानी पवईदरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. घणसोली सब वेमध्ये पाणी साचल्याचे वृत्त आहे.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तसेच, लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचले

उपनगरातील बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने धुमाकूळ घातला