Lockdown : सो गया है रस्ता... कडक निर्बंधातही मुंबईत दिसतोय 'लॉकडाऊन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:28 AM2021-04-10T11:28:10+5:302021-04-10T11:58:40+5:30

मुंबईच्या रस्त्यावर सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची झलक पाहायला मिळाली. रस्ते निर्मनुष्य दिसून आल्याने पुन्हा एकदा जुन्या लॉकडाऊनची आठवण झाली.

राज्यात कडक लॉकडाऊनला व्यापाऱ्यांकडून होत असलेला विरोध तसेच ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांची दखल सरकारने घेतल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्यापारी संघटनांनी केलेल्या चर्चेनंतर आता शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली.

शुक्रवारी या संदर्भातील सुधारित नियमावली जारी करण्यात आली. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ नियमावलीत नवीन बदलांचा समावेश केला आहे.

‘वीकेंड लॉकडाऊन’मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचेही नवीन आदेशात सुचविण्यात आले आहे.

पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन असे सूत्र आधी निश्चित करण्यात आले होते. मात्र, आजची नियमावली बघता वीकेंडलादेखील कडक निर्बंधच असतील.

मुंबईच्या रस्त्यावर सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची झलक पाहायला मिळाली. रस्ते निर्मनुष्य दिसून आल्याने पुन्हा एकदा जुन्या लॉकडाऊनची आठवण झाली.

मुंबईतील सीएसटी परिसरात आणि महापालिका परिसरात ना गर्दी दिसली, ना ट्रॅफिक. त्यामुळे, मुंबईकरांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

राज्यात 5 दिवस कडक निर्बंध आणि शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन लादण्यात आला आहे. त्या, पार्श्वभूमीवर 5 दिवस निर्बंध पाळल्यानंतर आज लोकं घरीच असल्याचे दिसून येते.

शहरातील विविध चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून विचारणा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लॉकडाऊनसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीनंतर पुढील लॉकडाऊनसंदर्भात माहिती मिळणार आहे, तोपर्यंत कडक निर्बंध लागूच राहणार आहेत

Read in English