ससून डॉकवर स्ट्रीट आर्ट प्रदर्शनातून कोळी जीवनावर प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 13:00 IST2017-11-18T12:48:14+5:302017-11-18T13:00:15+5:30

ससून डाँकवर Str + art व पोर्ट ट्रस्टतर्फे स्ट्रीट आर्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात देश- विदेशातील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक विकासमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मुंबईच्या कोळी लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकणा-या कलाकृतीही येथे सादर करण्यात आल्या आहेत.

माशांची जाळी, समुद्र, जलप्रदुषण अशा विविध मुद्द्यांचा विचार चित्रे आणि इन्स्टाँलेशनच्या माध्यमातून केला आहे. 

ससून धक्क्याचा सागरमाला प्रकल्पातून विकास केला जात आहे. 

या प्रदर्शनाला मुंबईतील कलाप्रेमी नागरीक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. 

मुंबईसारख्या धावत्या शहरात स्ट्रीट आर्टला चांगले दिवस येतील असे मत आयोजकांनी या प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाला अनुभवल्यावर व्यक्त केले आहे.