करीना कपूरचा खल्लास करणारा इंडियन लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:53 IST2018-02-23T14:51:37+5:302018-02-23T14:53:53+5:30

बॉलिवूडची बेबो करीना कपूरनं बंगळुरूतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करीनानं काळा, गुलाबी व लाल या रंगांचे कॉम्बिनेशन असलेली साडी परिधान केली होती.

या साडीमध्ये करीना अतिशय सुंदर दिसत होती.

हॉट मॉम करीना कपूर आपल्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

काळा, गुलाबी, लाल रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या साडीवर करीनानं फुल स्लीव्सचे ब्लाऊज घातले होते. या इंडियन लूकमध्ये करीना मनमोहक दिसत होती.

करीना कपूर आपल्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिचा प्रत्येक लूक हा युनिक असतो.

ड्रेसिंग स्टाइलमध्ये करीनाच्या चाहत्या तिला कॉपी करताना अनेकदा पाहायला मिळतात.