हॅप्पी होली, विथ फॅमिली; राजकीय नेत्यांचं आंगण ते क्रिकेटचं मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 20:16 IST2024-03-25T20:06:58+5:302024-03-25T20:16:47+5:30

देशभरात होळीचा उत्सव मोठ्या धुमधड्यात सुरू आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह महानगरांमध्ये होळीचे रंग दिसून येतात.

होळीच्या सणानिमित्ताने बॉलिवूमधील गाण्यांची रंगीत-संगीत मेजवाणीही आपण अनुभवतो. त्या रंगात बॉलिवूड सेलिब्रिटीही रंगल्याचे दिसून येतात.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या कुटुंबासमवेत होळीच्या रंगांची उधळण केली. आपल्या लाडक्या लेकीसोबत त्याने होळीचे रंग खेळून पिचकारीतून फवारे उडवल्याचेही फोटोही शेअर केले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या कुटुंबासमवेत होळीच्या रंगात रंगून आनंदोत्सव साजरा केला. अमृता फडणवीस आणि त्यांची कन्या हेही या आनंदात सहभागी झाले होते.

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या कुटुंबासमवेत होळीच्या रंगात रंगून आनंद साजरा केला आहे. त्यांचाही होळीच्या रंगात रंगल्याचा फोटो सोशल मीडियातून समोर आला आहे.