प्रवाशांसाठी ‘अच्छे दिन’ ! लोकल प्रवाशांसाठी १०० नव्या फे-या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 19:06 IST2017-09-28T18:45:00+5:302017-09-28T19:06:18+5:30

रेल्वेमंत्री पियूष गोयल १०० लोकल फे-यांची घोषणा करणार आहेत. ऑक्टोबरपासून हार्बरवर नवीन फे-या सुरू होणार आहेत. मात्र मध्य मार्गावरील प्रवाशांना वाढीव फे-यांसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी ऑक्टोबरपासून लोकल प्रवास सुलभ होण्याची चिन्हे आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रत्येकी १४ फे-या वाढणार आहेत. तर मध्य मार्गावर १६ फे-यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई उपनगरीय सेवेत सध्या २,९८३ लोकल फे-या सुरू आहेत. यापैकी मध्य रेल्वेवर १,६६० लोकल फे-या होतात.

उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. परिणामी, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी फेºया वाढवण्याची चर्चा बरेच दिवस रेल्वे वर्तुळात रंगत होती. लोकल फेºया वाढवण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर वेळप्रसंगी रेल रोकोही करण्यात आला होता. त्यामुळेच अखेर वाढीव लोकल फेºया सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

100 पैकी 68 लोकल फे-या (यातील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रत्येकी १४ फे-या) या मध्य मार्गावर आणि 32 लोकल फे-या या पश्चिम रेल्वेमार्गावर होतील. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील प्रत्येकी १४ फे-या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मध्य मार्गावरील वाढीव १६ फे-या १ नोव्हेंबरपासून सुरू होतील. उर्वरित लोकल फे-या जानेवारी २०१८मध्ये सुरू होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तवली आहे.