Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 20:24 IST2025-08-24T20:21:49+5:302025-08-24T20:24:36+5:30
Lalbaugcha Raja 2025 First Look Photos: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाची २०२५ची पहिली झलक समोर आली आहे.

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाची २०२५ची पहिली झलक समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, यंदा लालबागच्या राजाचा राजेशाही थाट पाहून भाविक भारावून गेले आहेत.
Lalbaugcha Raja 2025 Photo
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात आहे. मुंबईतील मंडळांचे गणपती विशेषतः प्रसिद्ध असून, जगभरात त्यांची ख्याती आहे. यापैकीच एक म्हणजे 'नवासाला पावणारा गणपती' अशी ओळख असलेला लालबागचा राजा.
Lalbaugcha Raja 2025 HD Image
आज लालबागच्या राजा मंडळाने आपल्या गणपतीची पहिली झलक दाखवताच हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. यंदाची थीम काय असेल आणि बाप्पाचे रूप कसे असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
Lalbaugcha Raja 2025 HD Photo
लालबागच्या राजाचे विलोभनीय रूप समोर येताच उपस्थितांनी 'गणपती बाप्पा मोरया' असा जयजयकार केला. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो मुंबईकर दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे राहतात.
यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे. यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आला आहे.
लालबागच्या राजाची मूर्ती वात्सल्याने भरलेली असून, ती सोनेरी अलंकारांनी सजवण्यात आली आहे. सोन्याच्या पादुकांपासून ते सोन्याच्या राजमुकुटापर्यंत राजाचा हा राजेशाही थाट भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे.
यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे हे दृश्य अधिक भव्य दिसत आहे.
लालबागचा राजा आणि भक्तांचे एक खास नाते आहे. आपल्या नवसाला हा गणपती पावतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने प्रत्येकजण त्याच्या चरणी लीन होतो.