ओखी चक्रीवादळामुळे मुंबईतील जनजीवन झाले विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 23:38 IST2017-12-05T22:59:38+5:302017-12-05T23:38:13+5:30

ओखी चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांत जनजीवन विस्कळीत झाले होते. (छायाचित्र- सुशील कदम)
शिवाजी पार्कवरही मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकही काही अंशी धीम्या गतीने सुरू होती.
चक्रीवादळासह पावसामुळे मंगळवारी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर उर्वरित दैनंदिन व्यवहारही धिम्या गतीने सुरू होते.
समुद्रात मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर घोंगावत असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकले आहे.
ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला होता.
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलही स्लो ट्रॅकवर आली होती.