Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडचं या कलाकारांचं मानधन वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 15:43 IST

1 / 8
1) माधुरी दीक्षित - नच बलिए आणि झलक दिखला जा - माधुरीने सिने इंडस्ट्रीत कमबॅक केल्यानंतर दोन डान्स शोमध्ये ती परीक्षक म्हणून दिसली. एक होता नच बलिए आणि दुसरा होता झलक दिखला जा. यापैकी झलक दिखला जा या शो च्या एका एपिसोडसाठी तिला 1 कोटी रुपये मानधन मिळालं होतं.
2 / 8
2) हृतिक रोशन - जस्ट डान्स - आपल्या वेगळ्या आणि दमदार डान्समुळे हृतिक हा लोकप्रिय आहे. हृतिक जस्ट डान्स या शोमध्ये परीक्षक म्हणून आला होता. या शो च्या एका एपिसोडसाठी त्याला चक्क 2 कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं.
3 / 8
3) करण जोहर - झलक दिखला जा - करण जोहर हा झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या अनेक सीझनमध्ये परीक्षक होता. या कार्यक्रमाच्या एका सीझनसाठी त्याने 10 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.
4 / 8
4) शाहिद कपूर - झलक दिखला जा - शाहिद कपूरचं डान्सबद्दलचं प्रेम हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानेही 2015 मध्ये झलक दिखला जा या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केलंय. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी त्याने 1.75 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. असं त्याने एक सीझन केलं.
5 / 8
5) जॅकलिन फर्नांडिस - झलक दिखला जा - आपल्या खास अदांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री जॅकलिनने आपल्या डान्सनेही सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. ती सुध्दा झलक दिखला जा या कार्यक्रमात ती परीक्षक म्हणून आली होती. यासाठी तिला 1.25 कोटी रुपये मानधन दिलं होतं.
6 / 8
6) शिल्पा शेट्टी - नच बलिए, सुपर डान्सर - शिल्पा शेट्टी आधीच योग टिचर म्हणून काम करत आहे. त्यातून तिने अफाट पैसा कमवलाय. त्यासोबतच ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून आली होती. शिल्पाने नच बलिए, जरा नच के दिखा आणि झलक दिखला जा या कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून काम केलंय. तर तिने सुपर डान्सर या लहान मुलांच्या एका सीझनसाठी 14 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.
7 / 8
8) सोनाक्षी सिन्हा -नच बलिए - सोनाक्षी सिन्हाने अनेक सिनेमात अफलातून डान्स केलाय. त्यासोबतच तिने नच बलिए कार्यक्रमाचं परीक्षक म्हणून काम केलं होतं. त्यासाठी तिला एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.
8 / 8
9) मलाईका अरोरा खान - इंडियाज गॉट टॅलेंट - मलाईका अरोरा ही अनेक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून जात असते. पण तिचा इंडियाज गॉट टॅलेंट हा कार्यक्रम फारच गाजला. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी तिला 1 कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं.
टॅग्स :Televisionटेलिव्हिजनbollywoodबॉलिवूड