Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 15:50 IST
1 / 8गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.2 / 8सोमवारी रात्री मराठवाड्यात याचा परिणाम पाहायला मिळाला असून मराठवाड्यात मुसधार पाऊस पडला आहे. शेकडो गावात पाणी शिरले असून नद्यांना पूर आलाय. 3 / 8आज 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, दुपारी 2 वाजताच पावसाला सुरुवात झाली आहे. 4 / 8मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असू शकतो. 5 / 8समुद्र किनारपट्टीवर मासेमाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील 3 दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 6 / 8मुंबईत दिवसाच रात्र झाल्याचं दिसून आलं, रस्त्यांवरील वाहनांना दिवसाच गाडीची हेडलाईट सुरू करुन प्रवास करावा लागत आहे. आभाळात काळे ढग दाटले असून सगळीकडे अंधार पसरलाय. 7 / 8गुलाब वादळाचा मुंबईलाही तडाखा बसत असल्याचे दिसते. ऑफिस, कार्यालयांसह घरातही दिवसाच दिवे लागले आहेत. अंधार पडल्याने वातावरणच बदलून गेलंय. 8 / 8रस्त्यावरील वाहनांची आणि पादचाऱ्यांची प्रवास करताना मदछाक होत असून पादचारी आडोसा शोधत आहेत. तर, वाहनचालक वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.