Chinchpokli Cha Chintamani 2019: आम्ही शंभरीचे साक्षीदार... चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन थाटामाटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 18:02 IST2019-08-11T17:48:45+5:302019-08-11T18:02:03+5:30

मुंबईत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्री’चे आगमन होत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यास दणक्यात सुरुवात झाली आहे.
यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 100 वं वर्ष आहे.
करी रोड येथील खातूंच्या कार्यशाळेतून निघालेल्या चिंतामणीचे फोटो काढण्यासाठी हजारो तरुण व तरुणी एकवटले आहेत.
गणेश टॉकीजपासून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळानेदेखील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनीही गर्दी केली आहे.
सामाजिक कार्याचा वसा जपत या मंडळाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर बेघर झालेल्या पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाख रुपये देण्याचे ठरविले आहे.
चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होताना दान करण्याचं आवाहन केलं आहे.
आगमन सोहळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांच्या मदतीला वेगळ्या ओळखपत्रासह 200 स्वयंसेवकांसह 1 हजार सहाय्यक सदस्य यांची फौज आणि मंडळाचे 125 कार्यकारिणी सदस्य आहेत.