Best Strike: कामगारांचा जल्लोष, पहिली बस आगाराबाहेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 21:41 IST2019-01-16T20:09:16+5:302019-01-16T21:41:29+5:30

8 दिवसांपासून संपावर असलेल्या बेस्ट कामगारांनी आज प्रशासनाविरुद्धची लढाई जिंकली आणि पहिली बस आगाराबाहेर पडली. (सर्व छायाचित्र- सुशील कदम)
राव यांच्या या घोषणेनंतर कामगारांनी एकच जल्लोष असून, हा विजय अनेक कामगारांच्या डोळ्यात हसू अन् आसू घेऊन आला.
वडाळा येथील बस आगरशेजारील कामगार वसाहतीमध्ये कामगारांचा मेळावा पार पडला. यावेळी कामगारांनी हात उंचावून जल्लोष केला.
कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांचे, कोण आला रे कोण आला, बेस्टचा वाघ आला असे जोरदार स्वागत राव यांचे करण्यात आले. या संपात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार राव यांनी मानले.
मुंबईकर जनतेलाही गुडघ्यांवर बसून शशांक राव यांनी सलाम केला. कामगारांचा लढा यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
बेस्टमध्ये 1500 गाड्या आणि खासगी कर्मचारी घेण्याचा डाव होता, हे सर्व मृत्यूपत्र होत, असे म्हणत शशांक राव यांनी शिवसेनेच्या संघटनेला चपराक लगावली.
यावेळी बसमधून प्रवास करताना नागरिकांनी खिडकीतून हात बाहेर काढत आनंद व्यक्त केला.