रेल्वे प्रशासनानं बापूंना वाहिली आगळीवेगळी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:27 IST2018-10-02T15:11:32+5:302018-10-02T15:27:12+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आज देशभरात साजरी केली जातेय. त्यानिमित्तानं रेल्वे प्रशासनानंही बापूंना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सेंट्रल रेल्वेनं ट्रान्स हार्बर लोकलना तिरंग्याच्या रंगांत झळाळून टाकलं आहे.
तर काही लोकलच्या डब्यांवर जय जवान जय किसानचा नारा देणा-या शेतक-याचं चित्र छापलं आहे.
तसेच या लोकलच्या डब्यांवर बापूंचा चरखा हातात धरून सूतकताई करतानाची चित्रं छापण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे गांधीजींच्या जयंती निमित्त मध्य रेल्वेनं स्वच्छ भारत मिशनचाही संदेश दिला आहे.