'हा यमराज डोळा ठेवतो आणि जीव वाचवतो'; अपघात रोखण्यासाठी रेल्वेची अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 01:48 PM2019-11-07T13:48:24+5:302019-11-07T13:52:12+5:30

लोकांना ट्रॅक ओलांडण्याच्या धोक्यांविषयी जागरूक करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, त्यांना पूल / भुयारी मार्ग वापरण्यास आणि त्यांना ट्रॅक ओलांडण्यापासून रोखण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

अंधेरी व मालाड स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविली. यमराजच्या पोशाखात आरपीएफच्या एका कर्मचाऱ्याने लोकांना ट्रॅक ओलांडण्यापासून परावृत्त करत आहे.

मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या उपनगरीय लोकल सेवांबाबत अजूनही रेल्वे प्रशासनाकडून खूप अपेक्षा आहेत.

लोकल ट्रेन... म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन आणि जलद प्रवासाचा एक उत्तम पर्याय मानला जातो. मात्र, याच मुंबईतील लोकल ट्रेनमुळे एकाच दिवसात १६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते.