By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:32 IST
1 / 7Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताला एक आठवडा उलटला. त्या दिवशी विमानातून एकूण पाच जण प्रवास करत होते. यामध्ये सगळ्यांचा मृत्यू झाला.2 / 7या अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता आणखी एका बड्या नेत्याने दावा केला आहे. यामध्ये त्यांनी त्या दिवशी अजित पवार यांच्यासोबत मी स्वत: प्रवास करणार होतो पण ऐनवेळी विमान प्रवास टळला असा दावा केला.3 / 7'अपघातग्रस्त विमानात मी देखील असतो. पण, नियतीमुळे वाचलो, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. २८ जानेवारीला मी देखील बारामतीला अजित पवार यांच्यासोबत जाणार होतो. त्याच विमानाने जाणार होतो. पण, मी मुंबईत उशीरा पोहोचलो त्यामुळे जाऊ शकलो नाही, असंही जानकर म्हणाले.4 / 7अपघाताच्या काही दिवस आधी अजित पवारांशी संवाद झाला होता. त्याचवेळी त्यांनी बारामतीला एकत्र जाऊ म्हटलं होतं. २८ जानेवारीच्या सकाळी आम्ही दोघे एकाच विमानानं जाणार होतो. पण मी मुंबईत उशिरा पोहोचलो. त्यामुळे अजित पवारांसोबत बारामतीला जाऊ शकलो नाही. अजित पवारांचा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूनं राज्याची मोठी हानी झाली आहे, असंही महादेव जानकर म्हणाले.5 / 7अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला सकाळी पावणे नऊच्या सुमारास अपघात झाला. दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्यानं आणि विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.6 / 7जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते.7 / 7दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. अजित पवार यांच्यासह एकूण ४ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयावह होता कि, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.