सुपरफास्ट! मुंबईच्या भुयारी मेट्रोचं काम ८० टक्के पूर्ण, पाहा PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:23 IST2023-04-10T10:43:05+5:302023-04-10T11:23:14+5:30

'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या भुयारी मेट्रो ३ चे काम आता आणखी वेगाने सुरू झाले आहे.
आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या कामाने आता ८६ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.
बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचे काम ७६ टक्के झाले आहे.
एकूण कामाची प्रगती ८० टक्के झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.
कारशेडच्या वादामुळे रखडलेली कुलाबा ते सीप्झ ही मेट्रो ३ पुढील वर्षाच्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.
प्रकल्प रखडल्यामुळे या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढली आहे.
पूर्ण झाल्यावर. ३३..५ किमी लांबीची लाइन मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मार्ग असेल , जिथे 27 स्थानके असतील.
प्रत्येकी 5.2 मीटर व्यासाचे जुळे बोगदे जमिनीपासून 20-25 मीटर खोलीत तयार केले गेले आहेत.