मराठी भाषा दिनानिमित्त परळमध्ये ५०x३० फुटांची भव्य रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:01 IST2018-02-26T16:00:08+5:302018-02-26T16:01:10+5:30

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस आणि मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून परळमध्ये ५०x ३० फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

रंगरेषा या रांगोळी ग्रुपने ही ५०x ३० फुटांची रांगोळी साकारली आहे.

परळच्या आर. एम. भट्ट हायस्कूलमध्ये ही रांगोळी काढण्यात आली आहे.

यासाठी तब्बल २०० किलो रंग रांगोळी वापरण्यात आली.

रांगोळी पूर्ण करण्यासाठी कलाकारांना जवळपास २३ तास लागले.

रांगोळीमधील कविता विपुल शिवलकर याने लिहिली आहे.

ही रांगोळी १मार्चपर्यंत सर्वंना पाहता येणार आहे.