रतन टाटांसह 31 जणांचा 'मुंबई रत्न' पुरस्काराने गौरव, राज्यपालांच्याहस्ते सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 01:55 PM2021-07-20T13:55:25+5:302021-07-20T14:07:35+5:30

राजधानी मुंबईत राहून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या कार्यातून आदर्शन निर्माण करणाऱ्या निवडक व्यक्तींचा मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

राजधानी मुंबईत राहून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या कार्यातून आदर्शन निर्माण करणाऱ्या निवडक व्यक्तींचा मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. फिल्म्स टुडे, नाना नानी फाऊंडेशन व एनार समूहातर्फे हा पुरस्कार देण्यात आले.

उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात.

मात्र, सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयंका,

वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ. शोमा घोष, आशिष चौहान आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. दरम्यान, कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.

प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांसह सिने श्रेत्रातील नामवंत गायक उदीत नारायण यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी सामाजिक भान जपत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करण्याचं सर्वच दिग्गजांना सूचवलं आहे.

उद्योजक आणि टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले, पण ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.