गेल्या २४ तासांत शून्य पावसाची नोंद; मुंबईत पाऊस बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:40 IST2020-07-23T02:13:01+5:302020-07-23T06:40:36+5:30

७ ठिकाणी पडझड, महिला जखमी

Zero rainfall recorded in last 24 hours; Rain disappears in Mumbai | गेल्या २४ तासांत शून्य पावसाची नोंद; मुंबईत पाऊस बेपत्ता

गेल्या २४ तासांत शून्य पावसाची नोंद; मुंबईत पाऊस बेपत्ता

मुंबई : पावसाने मुंबईत बऱ्यापैकी विश्रांती घेतली असून, गेल्या २४ तासांत मुंबईत सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत ०.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कोसळत नसला तरी ७ ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, २ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.

परळ येथील पेरू चाळीमध्ये छताचा भाग कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. मनस्वी चिल्ले असे या महिलेचे नाव आहे. ४ ठिकाणी झाडे कोसळली. एका ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडली. सुदैवाने उर्वरित घटनांत कोणीही जखमी झालेले नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. मुंबईत कित्येक दिवसांनी कडाक्याचे ऊन पडले होते.

हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण नाही. २६ जुलैच्या आसपास हवामानात मान्सूनसाठी पोषक बदल होतील. नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Zero rainfall recorded in last 24 hours; Rain disappears in Mumbai