'सत्ता गेली म्हणून आता काहीतरी....'; राहुल कनाल यांच्या चर्चांवर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:05 IST2023-06-30T15:11:20+5:302023-06-30T16:05:00+5:30

राहुल कनाल यांच्या सुरु असणाऱ्या चर्चांवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yuva Sena leader Varun Sardesai has reacted to the ongoing discussions of Rahul Kanal. | 'सत्ता गेली म्हणून आता काहीतरी....'; राहुल कनाल यांच्या चर्चांवर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया

'सत्ता गेली म्हणून आता काहीतरी....'; राहुल कनाल यांच्या चर्चांवर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया

मुंबई: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या म्हणजेच १ जुलै रोजी राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

राहुल कनाल आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये पटेनासे झाले आहे. आमच्या मैत्रीत कोणी तरी भांडणं लावून देत असल्याची प्रतिक्रिया राहुल कनाल यांनी व्यक्त केली होती. कनाल हे युवा सेनेचं काम पाहायचे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. आज राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. 

राहुल कनाल यांच्या सुरु असणाऱ्या चर्चांवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाच्या वाटेवर कोण आहे?, कोण जात आहे, हे त्यांनाच विचारा. राहुल कनाल हा माझा चांगला मित्र आहे. इतके दिवस आम्ही एकत्र काम करत होतो. सत्ता गेली म्हणून आता काहीतरी कारणे देऊन दुसऱ्या पक्षात जात आहेत, असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी संधी दिली म्हणून ते युवानेते झाले. नेते झाले म्हणून अन्याय झाला का?, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करावे म्हणून कमी लोकांना संधी मिळते. 

राहुल कनाल नेमकं काय म्हणाले?

युवासेना मध्यवर्ती कार्यालयाचा स्क्रीनशॉट शेअर करत राहुल कनाल म्हणाले की, दु:ख होतंय. हे कोणी केलं चांगलच माहित आहे. पण तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं, त्यांचं न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे. तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही, ज्यांनी रात्रंदिवस काम केलं आहे. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अॅरोगन्स क्या होता है, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.

कोण आहे राहुल कनाल?

राहुल कनाल हे शिवसेनेचे पदाधिकारी असून राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसेच ते युवासेनाच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना शिक्षण समितीही दिली होती. तसंच श्री साई बाबा संस्थानचे विश्वस्त पदही त्यांचेकडे आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Yuva Sena leader Varun Sardesai has reacted to the ongoing discussions of Rahul Kanal.