मुंबई - अज्ञात तांत्रिक बिघाडामुळे यूट्यूबची सेवा रात्री ठप्प झाली. या बिघाडामुळे यूट्यूब चॅनेलवर क्लीक केल्यास एरर दाखवण्यात येत आहे. जवळपास सर्वच यूट्युब चॅनेलच्या बाबतीत हा बिघाड दिसून येत होता. त्यामुळे ऑनलाइन व्हिडिओ पाहणाऱ्यांची गैरसोय झाली होती. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही सेवा सुरळीत झाली. आज रात्री साडे बारा वाजल्यापासून ही समस्या भेडसावू लागली असून, चॅनलच्या हँडलवर क्लिक केल्यास व्हिडिओंऐवजी An error occurred. Please try again असा मेसेज दिसत होता. त्यामुळे यूट्यूब चॅनेल्सचे होमपेज दिसणे बंद झाले आहे. मात्र व्हिडिओ लिंकवर क्लिक केल्यास व्हिडिओ पाहता येत होते. याआधी एक एप्रिल आणि 21 मार्चरोजी सुद्धा यूट्यूबवर अशीच समस्या भेडसावली होती. दरम्यान, यूट्यूब प्रशासने पहाटे आपल्या ट्वविटर अकाऊंटवरून बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती दिली.
तांत्रिक बिघाडामुळे यूट्यूब तीन तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 06:40 IST