Join us

जेवणाच्या वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या; पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:34 IST

ही घटना रविवारी रात्री घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

मुंबई : चेंबूरमध्ये जेवण घेण्यावरून झालेल्या वादात दोघांनी एका २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करीत, त्याची हत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

चेंबूरच्या अशोक नगर परिसरात राहणाऱ्या अनिल रणदिवे या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री चेंबूर कॉलनी परिसरात असलेल्या सनिधी या बारमधून तो काही खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेला होता. यावेळी याठिकाणी अन्य दोघेजण खाद्यपदार्थ घेण्यासाठी उभे होते. या तिघांमध्ये पहिले पार्सल कोण घेणार यावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रितीक बजाज (वय २३) आणि हर्षद वलोड्रा (२७) या दोघांनी अनिल याला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस