Join us

बोरीवली येथे दुचाकीच्या धडकेत तरुण ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:12 IST

अपघाताची घटना त्याची पत्नी ऐश्वर्या हिला समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात तसेच देवीपाडा येथील खासगी डॉक्टरांकडे नेले. मात्र...

मुंबई : कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास देवीपाडा मेट्रो रेल्वे स्टेशनसमोर अज्ञात दुचाकीस्वाराने विशाल हरिजन (२५) याला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. 

 अपघाताची घटना त्याची पत्नी ऐश्वर्या हिला समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात तसेच देवीपाडा येथील खासगी डॉक्टरांकडे नेले. मात्र, त्याच्या पोटाचे दुखणे कमी होत नव्हते. त्यामुळे २६ जुलै रोजी त्याला रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना २७ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. 

    हरिजन याला दारूचे व्यसन होते आणि तो २५ जुलै रोजी दारूच्या नशेत असताना बोरीवली पूर्व हायवेवर तोल जाऊन पडला होता. त्यादरम्यान त्याचा हा अपघात झाला. ज्यात त्याच्या खांद्याला, पायाला, डाव्या डोळ्याजवळ तसेच पोटाला दुखापत झाल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज शोधून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :मुंबईअपघातबाईक