‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:15 IST2025-11-04T13:48:15+5:302025-11-04T14:15:58+5:30
Naseem Khan News: काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केला पाहिजे. ‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार काम केले पाहिजे, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आज मुंबईत केलं आहे.

‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
मुंबई - काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केला पाहिजे. ‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार काम केले पाहिजे, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आज मुंबईत केलं आहे.
मुंबई युवक काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा झीनत शबरीन व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळ्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केला पाहिजे. ‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार काम केले पाहिजे. देशात महागाई, बेरोजगारी, मतोचोरी, सारखे असंख्य मुद्दे आहेत. बीएमसी मध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाच वर्षापासून नगरपालिका महानगरप पालिकांमध्ये निवडमुकी झालेल्या नाहीत. राज्य सरकार या पालिकांचा कारभार पहात असल्याने भ्रष्टाचार वाढला आहे. युवक काँग्रेसने जनतेचे मुद्दे घेऊन सरकारला जाब विचारला पाहिजे. राहुल गांधी लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांचे हात मजबूत करण्याचे काम केले पाहिजे.
यावेळी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा झीनत शबरीन यांचं कौतुक करताना राजकारणात काही करुन दाखवण्याची जिद्द, दृष्ट निश्चय आणि संघर्ष करण्याचा इरादा झीनत शबरीन यांच्यात आहे. झीनत म्हणजे अलंकार आणि हा अंलकार युवक काँग्रेसला लाभला आहे असे उद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, झीनत शबरीला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण तीची कष्ट करण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रचंड मोठा इच्छाशक्ती आहे. तीच्या घरच्यांनीही तीला राजकारणात जाण्याची परवानगी दिली आहे. ती नक्कीच युवक काँग्रेससाठी चांगले काम करेल अशी आशा व्यक्त करत शबरीन यांना शुभेच्छा देत हर्षवर्धन सपकाळ यांनी, “शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही”, या शब्दात आपल्या भाषणाचा शेवट केला.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यावेळी म्हणाले की, देशातील युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करेल त्यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. झीनतमध्ये संघर्ष करण्याचा क्षमता आहे, उर्जा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक काँग्रेस नक्कीच चांगले काम करेल आणि युवक काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे नाव उज्ज्वल करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.