सी-लिंकवरुन उडी मारत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंगातून उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 11:26 IST2023-11-13T11:22:09+5:302023-11-13T11:26:00+5:30

प्रेमभंग झाल्याच्या दु:खातून एका तरुणाने वांद्रे वरळी सी-लिंकवरुन समुद्रात उडी मारत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली.

Youth commits suicide by jumping from sea link | सी-लिंकवरुन उडी मारत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंगातून उचललं टोकाचं पाऊल

सी-लिंकवरुन उडी मारत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंगातून उचललं टोकाचं पाऊल

मुंबई-

प्रेमभंग झाल्याच्या दु:खातून एका तरुणाने वांद्रे वरळी सी-लिंकवरुन समुद्रात उडी मारत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आकाश सिंह (२८) असे आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आईवडील असा परिवार आहे. 

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळ येथील राहणारा असलेला आकाश एका खासगी बँकेत कामाला होता. शुक्रवारी तो वांद्रे कुर्ला संकुलातून परळ येते जाण्यासाठी टॅक्सीत बसला. त्याने चालकाला टॅक्सी सी-लिंकमार्गे नेण्यास सांगितले. 

टॅक्सी सी-लिंकवर आली असता मोबाइलवर बोलत असलेल्या आकाशने फोन खाली पडल्याचे सांगत चालकाला टॅक्सी थांबविण्यास सांगितले. सी-लिंकवर गाडी उभी राहताच आकाशने खाली उतरत थेट समुद्रात उडी मारली. 

या प्रकाराने अवाक झालेल्या टॅक्सीचालकाने तातडीने ही माहिती टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छीमार यांच्या साह्याने आकाशचा शोध सुरू झाला. 

तीन तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. आकाश एका नातेसंबंधात गुंतला होता. मात्र, काही कारणात्सव ते तुटले. आकाशच्या नातेवाईक आणि मित्रांचे जबाब नोंदविण्याचे काम पोलीस करत आहेत.

Web Title: Youth commits suicide by jumping from sea link