‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 07:03 IST2025-11-02T07:01:32+5:302025-11-02T07:03:04+5:30
जेद्दाहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चेन्नई विमानतळावर २ ऑगस्ट १९८४ या दिवशी एका विमानात ज्याप्रमाणे बॉम्ब हल्ला झाला होता तसाच बॉम्ब हल्ला तुमच्या विमानात आज होणार असल्याचा संदेश आल्यानंतर जेद्दाहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईत शनिवारी करण्यात आले. इंडिगोच्या विमानात ही घटना घडली.
इंडिगो कंपनीचे ६ ई ६८ हे विमाने जेद्दा येथून हैदराबादसाठी निघाले होते. हे विमान सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी हैदराबाद येथे उतरणे अपेक्षित होते. ऐन विमान प्रवासात वैमानिकाला १९८४ मद्रास बॉम्ब अटॅक होणार असल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर वैमानिकाने त्यावेळी नजीक असलेल्या मुंबई विमानतळाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधत तातडीने विमान उतरविण्याची अनुमती मागवली.