Join us

Mumbai: हल्ला करून तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं, दादरमधील धक्कादायक प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 00:06 IST

Crime News: एका तरुणीवर हल्ला करून तिला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून देण्याची धक्कादायक घटना आज दादर रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री घडली आहे.

एका तरुणीवर हल्ला करून तिला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून देण्याची धक्कादायक घटना आज दादर रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री घडली आहे. पुण्याकडून मुंबईला आलेल्या उद्यान एक्स्प्रेसमधील महिलांच्या डब्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने ही तरुणी या हल्ल्यातून बचावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी मुंबईला येण्यासाठी पुण्याहून उद्यान एक्स्प्रेसमधील महिलांच्या डब्यात बसली. ही गाडी रात्री साडेआठच्या सुमारास मुंबईतील दादर स्थानकात आली. दरम्यान, ही ट्रेन दादर स्टेशनवर आली असताना एक तरुण महिलांच्या डब्यात घुसला. त्याने या तरुणीचा विनयभंग करून तिची बॅग खेचली. तसेच या तरुणीने प्रतिकार केला असता, तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच या हल्ल्यात बचावलेल्या तरुणीने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.   

टॅग्स :दादर स्थानकगुन्हेगारीमुंबईमध्य रेल्वे