कारच्या बोनेटवरून तरुणाला नेले फरफटत; 'ती' गाडी पोलिसांच्या अखेर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:58 IST2025-05-29T12:57:44+5:302025-05-29T12:58:18+5:30

ड्रायव्हरला पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशाने त्याच्या कारच्या बोनेटवर उडी मारली.

young man was dragged away from the bonnet of a car in the domestic airport area | कारच्या बोनेटवरून तरुणाला नेले फरफटत; 'ती' गाडी पोलिसांच्या अखेर ताब्यात

कारच्या बोनेटवरून तरुणाला नेले फरफटत; 'ती' गाडी पोलिसांच्या अखेर ताब्यात

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर डोमेस्टिक एअरपोर्ट परिसरात कॅबच्या बोनेटवरून एका तरुणाला फरफटत नेले जात असल्याचा एक व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एअरपोर्ट पोलिसांनी कॅबचालकावर गुन्हा दाखल केला आहे. कुणी प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट करून सोशल मीडियावर टाकल्यावर खळबळ उडाली होती.   

मुंबई विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलबाहेर आरोपी कॅबचालकाचे एका प्रवाशाशी काही कारणावरून वाद झाला. चालकाने त्या व्यक्तीला धक्काबुक्की केली आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, ड्रायव्हरला पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशाने त्याच्या कारच्या बोनेटवर उडी मारली. त्यावेळी गाडी थांबविण्याऐवजी कॅबचालकाने त्या व्यक्तीला त्याच अवस्थेत बोनेटवरून काही अंतरापर्यंत फरफटत नेले. 
या घटनेचे चित्रीकरण एका प्रत्यक्षदर्शीने केले आणि या प्रकाराची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिली. संबंधित व्हिडिओ आणि ठिकाणाची माहिती पोलिसांना पाठविली. 

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कॅबचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

विमानतळाबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ती गाडी पोलिसांच्या अखेर ताब्यात

व्हिडीओमध्ये, संबंधित व्यक्ती कार वेगाने जात असताना तिच्या कडांना धरून असल्याचे दिसते. 

याप्रकरणी भीमप्रसाद महंतो या चालकाविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम ३५(३) आणि मोटार वाहन कायदा, कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
 

Web Title: young man was dragged away from the bonnet of a car in the domestic airport area